अकोट (देवानंद खिरकर)- देशामधे महागाई व ईन्धन प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. ईंधन दर वाढीवर केंद्र सरकारने अंकुश लावावा, कॉग्रेस कमेटी जेष्ठ जिल्हा कार्यअध्यक्ष महेश गणगणे यांचा मार्गदर्शनात अशा मागणीसाठी विध्यार्थी काँग्रेस ने छत्रपती शिवाजी महाराज चौक अकोट येथे आंदोलन केले, त्यावेळी विध्यार्थी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष शिवराम डिक्कर यांनी केंद्र सरकार विरोधात नारेबाजी केली.
पेट्रोल व डिजल चे दर दररोज वाढत असल्यामुळे महागाईचा भडका उडालेला आहे. सामान्य नागरिकांच्या खीशाला कात्री बसत आहे त्यामुळे सामान्य नागरीकांचे जगणे कठीन झाले आहे. त्याच सोबत गॕस-सिलेंडर व खाद्य पदार्थ आणि सिमेंट, गीट्टी, लोखंड यांचे भाव गगनाला भिडलले आहे. व वाढत्या बेरोजगारीचे देखील प्रमाण वाढले आहे.या गोष्टीचा सामान्य नागरीकांना प्रचंड त्रास होत आहे.त्यासाठी आज विध्यार्थी काँग्रेस ने रस्त्यावर उतरुन केंद्र सरकार विरोधात तिव्र आंदोलन केले.त्यावेळी विध्यार्थी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष शिवराम डिक्कर, काँग्रेस कमिटीचे अरुण म्हैसने ,काँग्रेस ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रोशन चिंचोलकार, शुभम म्हैसने, मिलिंद नितोने, अभय तेलगोटे, शिवा वानखडे, रोशन मोरे, अक्षय पोटदुखे, प्रेम वानखडे, राहुल सपकाळ,अनिकेत गडम, अनंता म्हैसणे, राहुल पाचकोर, दिपक वानखडे, अजाबराव वानखडे, अंकुश सपकाळ, प्रभाकर म्हैसणे, तुशार वानखडे, मंगल वानखडे,अभिषेक ठाकरे, सुमित ठाकरे, सुनिल वानखडे, विशाल सपकाळ व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.