अकोला – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमार्फत विविध खेळांचे अनिवासी नि:शुल्क उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दि. 12 ते 30 एप्रिल दरम्यान वसंत देसाई क्रीडांगण येथे होणार असून प्रत्येक खेळाकरीता प्रत्येकी 30 मुले व मुलींना प्रथम तत्वावर येणाऱ्यांना प्रवेश देण्यात येईल.तरी इच्छुक मुले व मुली यांनी क्रीडा मार्गदर्शक यांच्याशी संपर्क साधून आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी केले.
उन्हाळी प्रशिक्षण शिबीरामध्ये कुस्ती, बॉक्सींग, कबड्डी, खो-खो या खेळाकरीता वयोगट 8 ते 12 वर्षाच्या मुले व मुलींना प्राधान्य देण्यात येईल. शिबीरांची कालावधी पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना क्रीडा कार्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात येईल. उन्हाळी प्रशिक्षण शिबीरात इच्छुक मुले व मुली यांनी कुस्ती खेळाकरीता लक्ष्मीशंकर यादव (मो.क्र.9689300669), बॉक्सींगकरीता सतीशचंद्र भट (9822724168), खो-खो व कबड्डीकरीता विजय खोकले (98227273201), व्हॉलीबॉलकरीता निशांत वानखडे(8446583001), हॅण्डबॉल करीता गोविंद दरपे (7721030802), मैदानी खेळाकरीता प्रविण खंडारे (8180838853) यांच्याशी संपर्क साधून आपली नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई स्टेडियम येथे करावी, असे कळविण्यात आले आहे