वीजटंचाईमुळे राज्याच्या काही भागात भारनियमन सुरू झाले आहे. अतिरिक्त वीज खरेदी केली नाहीतर हे भारनियमन आणखी वाढण्याची भीती आहे. ते टाळण्यासाठी तातडीची वीज खरेदी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. यामध्ये राज्यासाठी अतिरिक्त वीज खरेदी करत भारनियमन मुक्त करण्याचानिर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत राऊत यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, कडाक्याच्या उन्हामुळे चढलेला पारा उतरण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. उष्णतेच्या लाटेमुळे राज्यभर विजेची मागणी वाढली. सध्याची मागणी 28 हजार मेगावॅटची असून ती ३० ते ३२ हजार मेगावॅटपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
तूर्तास १५०० मेगावॅट विजेची टंचाई राज्यात निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारनियमन वाढवण्याची शक्यता होती परंतु मंत्रीमंडळाच्या बैठकीत अतिरिक्त वीज खरेदी करत राज्यावर असलेले भारनियमन मुक्त करण्याचा निर्णय झाला.