Google ने आपल्या लोकप्रिय Google Maps मध्ये एक भन्नाट फीचर आणले आहे. यातील एक खास फीचर म्हणजे टोल कर (toll tax) . या फीचरद्वारे आता युजर्सना प्रवास सुरू करण्यापूर्वीच वाटेत येणाऱ्या टोलवर किती कर भरावा लागेल, हे Google Map वर कळणार आहे. यासाठी गुगलने स्थानिक टोल प्राधिकरणाशी भागीदारी केली आहे. या नवीन सुविधेद्वारे, प्रवाशांना टोल मार्ग की नॉन-टोल मार्ग निवडायचा याची पूर्व कल्पना मिळणार आहे.
Google Map वरील या नवीन अपडेटमुळे प्रवाशांना ड्राइव्हचे नियोजन करणे, पैशांची बचत करणे आणि नवीन ठिकाणं शोधण्यासाठी मदत होणार आहे. Google Map च्या नकाशावर प्रवाशांना टोल शिवाय ट्रॅफिक संदर्भातील माहीतीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
टोल कराची कल्पना येण्यासाठी Google Map काही महत्त्वाच्या मुद्द्यांचे परीक्षण करेल. टोल कराचा (toll tax) खर्च पेमेंटची पद्धत, आठवड्याचा दिवस आणि टोल पास करण्याची अंदाजे वेळ या निकषांवर टोल कर अवलंबून असणार आहे. या महिन्यात भारतासह यूएस, जपान आणि इंडोनेशियामधील सुमारे २,००० महामार्गावरील टोलवर आणि Android आणि iOS स्मार्टफोन युजर्सकडे टोल कराची (toll tax) ही सुविधा सुरू होणार आहे.