• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पत्रपरिषदः महापुरुषांच्या विचारांचा होणार जागर: सामाजिक न्याय विभाग दि.16 पर्यंत राबविणार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम

Our Media by Our Media
April 6, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
81 1
0
पत्रपरिषदः महापुरुषांच्या विचारांचा होणार जागर: सामाजिक न्याय विभाग दि.16 पर्यंत राबविणार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम
13
SHARES
583
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.6  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दि.6 ते 16 एप्रिल या कालावधीत सलग 10 दिवस महात्मा जोतीबा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यात येणार आहे, याबाबत आज सामाजिक न्याय विभागातर्फे पत्रकार परिषदेत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाची’ माहिती देण्यात आली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. याच वेळी सामाजिक समता कार्यक्रमाची सुरुवातही करण्यात आली. पत्रकार परिषदेस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहायक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड, समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद अकोला डी.एम .पुंड, पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अलि मिरसाहेब, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय डांगे तसेच अन्य मान्यवरउपस्थित होते. या वेळी महात्मा जोतिबा फुले,राजर्षि शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा डॉ. राठोड यांनी सांगितली. त्यानुसार सामाजिक समता कार्यक्रमाची सुरुवात दि. 6 एप्रिल रोजी करण्यात येईल व जिल्हास्तरावर उपक्रमांची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. गुरुवार दि.7 रोजी विभागाच्या सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा होतील. शुक्रवार दि.8 रोजी जिल्हा व विभाग स्तरावर कार्यक्रम आयोजित करून स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरूपात वितरण होईल. शनिवार दि. 9 रोजी ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावे किंवा तत्सम उपक्रम राबवणे तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने विभागाच्या शैक्षणिक आस्थापनांमध्ये रक्तदान शिबीर आयोजित होतील.

रविवार दि. 10 रोजी समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहिती बाबत प्रबोधन करण्यात येईल. सोमवार दि. 11 रोजी महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करून विविध वक्त्यांना निमंत्रित करून महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल.मंगळवार दि. 12 रोजी मार्जिन मनी योजनेच्या जनजागृती बाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. बुधवार दि. 13 रोजी संविधान जागर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. गुरुवार दि. 14 रोजी सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थापनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी, व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जातील.

त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले जाईल. याच दिवशी सर्व जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत राहून, जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरीत करतील. शुक्रवार दि. 15 रोजी प्रत्येक सहाय्यक आयुक्त कार्यालयात महिला मेळावे आयोजित करून बाबासाहेबांनी महिलांविषयी केलेल्या कार्याची माहिती देणारे कार्यक्रम घेतले जातील. तृतीयपंथी जनजागृती व नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल. शनिवार दि. 16 या अंतिम दिवशी ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तींचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबवून या समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रम राबविला जाणार आहे.हे सर्व कार्यक्रम यशस्वी करावेत तसेच यात सर्वांनी सहभागी व्हावे ,असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी केले आहे.

Tags: AkolaBabasaheb Ambedkar Social Equality ProgramDepartment of Social JusticeProf. Sanjay Khadse
Previous Post

st strike : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे : हायकोर्ट

Next Post

अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांचा जिल्हा दौरा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
chhagan-bhujbal

अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांचा जिल्हा दौरा

महिला व बालविकास विभागाचा उपक्रम; बालगृहातील 61 बालकांचे लसीकरण

महिला व बालविकास विभागाचा उपक्रम; बालगृहातील 61 बालकांचे लसीकरण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.