अकोला- अकोला जिल्हा अंर्तगत टोळीने गुन्हे करणा-या गुन्हेगारी टोळ्यांवर आळा बसावा याकरीता पो.स्टे. बाळापुर, चे प्रभारी अधिकारी यांनी पो.स्टे. बाळापुर हद्दीतील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार नामे (१) संतोष लक्ष्मण ढोरे वय ५० वर्षे, (२) शिवाजी उर्फ प्रदिप लक्ष्मण ढोरे वय ४८ वर्षे, (३) चंदु उर्फ चंद्रशेखर जनार्धन ढोरे वय ३८ वर्षे, सर्व रा. गोरेगांव बु. जि. अकोला यांचेवरील गुन्हयांची मालिका पाहता त्यांचे विरुध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये अकोला जिल्हयातुन २ वर्षा करीता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून मा. पोलीस अधिक्षक सा. अकोला यांचे कडे सादर केला होता.
त्या अनुषंगाने आज दि. ०१/०४/२०२२ रोजी मा. पोलीस अधिक्षक सा. श्री. जी. श्रीधर जिल्हा अकोला यांनी नमुद गुन्हेगार यांना अकोला जिल्हयातुन २ वर्षाकरीता हद्दपार केल्याबाबत आदेश पारीत केले असुन नमुद ०३ गुन्हेगार यांना अकोला जिल्हयातुन दोन वर्षा करीता हद्दपार करण्यात आले आहे.
मा. पोलीस अधीक्षक सा. श्री. जी. श्रीधर यांनी अकोला जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्विकारल्यापासुन आजपावेतो एकुण ६२ ईसमांविरुध्द एमपीडीए अॅक्ट अन्वये कारवाई करण्यात आली ही आजपर्यतची अकोला जिल्यातील सर्वात मोठी कारवाईची संख्या असुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अन्ये एकुण १२० गुन्हेगारी टोळयांतील एकुण २९५ इसमांना तसेच कलम ५६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये ५० इसम असे एकुण ३४५ इसमांना आजपर्यंत अकोला जिल्हयातुन तडीपार करण्यात आले आहे. अकोला जिल्यातील आजपर्यंतची तडीपारीची ही सर्वांत मोठी कारवाई असुन नमुदची प्रभावी कारवाई करण्याकरीता जिल्हास्थरावर कुख्यात गुंड व टोळीने गुन्हे करणारे अशा लोकांनचे अभिलेख तपासुन हया कारवाया करण्यात आलेल्या आहेत.
अकोला जिल्हयात आगामी निवडणुकीचे तसेच सण उत्सवांचे अनुषंगाने त्याकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारी टोळयांची माहिती संकलीत करण्यात येत असुन त्यांचे विरूध्द वरील प्रमाणे प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे सुरू आहे.