अकोला– जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्र, अकोला या कार्यालयासह अमरावती विभागातील वाशिम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ऑनलाईन पद्धतीने आयोजित केला आहे. रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर, पदविका व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी 300 पेक्षा जास्त रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी दिली.
अमरावती विभागाच्या सर्व जिल्ह्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर सेवायोजना कार्डचा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्या लॉगीन मधुन शैक्षणीक पात्रेतेनुसार ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील रिक्तपदाकरीता दि.31 पर्यंत आवेदन करुन शकतो. तसेच ज्या उमेदवारांनी अद्याप सेवायोजन कार्ड नोंदणी केलेली नाही त्यानी संकेतस्थळावर तात्काळ नोंदणी करुन आनलाईन आवेदन करावे. ऑनलाईन अप्लॉय केलेल्या उमेदवारांची कंपनी, उद्योजक, एच.आर.प्रतिनिधी यांचे कडून ऑनलाईन मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणीक पात्रतेच्या आधारे ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होवून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे