अकोट(देवानंद खिरकर)- पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण जि. अकोला दि. 26/03/2022 रोजी रात्री पो उप नि धर्माजी डाखोरे हे आपल्या पो. स्टाफ सह पो. स्टे. परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली कि, दोन इसम हे फोर व्हीलर गाडीने शासनाने प्रतिबंधीत केलेला पानमसाला गुटखा अकोट कडून हिवरखेड कडे घेऊन जाणार आहे. अशा बातमीवरून त्यानी नाकाबंदी केली. त्या दरम्यान एक फोर व्हीलर गाडी क्र MH 31 DC 6023 तिथे आली. या गाडीच्या डिक्कीची पाहणी केली असता.
त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला गुटखा कि.3,37,050 रु चा माल आढळून आला. त्यासोबतच फोर व्हीलर क्र MH 31 DC 6023 किं.अंदाजे 80,000 रु असा एकूण 4,17,050रु चा माल मिळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, SDPO श्रीमती रितू खोखर यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. नितीन देशमुख, पो. उप नि. डाखोरे, पंचबुधे पोहेकाँ, कर्मचारी शैलेश जाधव, वामन मिसळ, गोपाल जाधव यांनी केली. या प्रकरणी ईमरानखान शरफुद्दीन खान, वय ३३ व अफसरखान गुलशरखान वय ४२ दोघेही राहणार मोर्शी ह्याना अटक करण्यात आली आहे.