अकोट (देवानंद खिरकर)- एलीचपुरवेस (शिवाजी महाराज नगर) ते राहुल नगर, वडगाव रेड, खाईनदी वरील कोल्हापूर बंधारा हा वीस-पंचवीस वर्षांपूर्वी बांधकाम केलेला बंधारा असून हा बंधारा मृद व जलसंधारण विभाग आकोट यांच्या अंतर्गत येत असून हा बंधारा बांधल्यापासून तर आज पर्यंत या बंदराची कसल्याही प्रकारची दुरुस्तीचे काम जलसंधारण विभागाकडून झाले नाही.
या बंधार्यावरून राहूल नगर, व वडगाव, ताजनापुर, देऊळगाव, असंख्य शेतकऱ्यांचे या बंधाऱ्यावर मुख्य रस्ता असून चोवीस तास या बंधाऱ्याच्या रस्त्यावरून नागरिकांचे व शाळेतील विद्यार्थ्यांचे येणे जाणे चालू राहते. पण खूप दिवसापासून या बंधाऱ्यावर च्या पुलावरील साईडला असलेले रेलींग नसल्यामुळे लोकांचा नदीत पडून अपघात होत आहे.
त्यामुळे बंदरावरील पुलावरील रेलिंग नसल्यामुळे नागरिकांच्या जिवाला खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे तसेच बंधारा खाली घाणीचे साम्राज्य असल्यामुळे आजूबाजूच्या लगतच्या वस्त्यांमध्ये रोगराई पसरत आहे. म्हणून या कोल्हापूरी बंधाऱ्यावरील पुलावरील रेलिंग चे काम बंधाऱ्यांची दुरुस्ती तसेच बंधारा खालील घाणीचे सर्व प्रकारे साफसफाई चे काम व्हावे व यानंतर कसल्याही प्रकारे जीवित हानी झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी जलसंधारण विभाग यांची राहील असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोट च्या वतीने निवेदन देतानी संदेश घनबहादुर यांनी सांगितले. व निवेदन देण्यासाठी राहुल नगरातील पंजाबराव तेलगोटे, विपिनभाऊ तेलगोटे, मिलिदभाऊ पळघामेल, हे उपस्थित होते