अकोट (देवानंद खिरकर) :- काही दिवसापूर्वी अकोट शहरात काही भागामध्ये एका पिसाडलेल्या कुत्र्याने 25 ते 30 लहान व मोठे मुलांना चावा घेतला त्या मध्ये काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अकोला जिल्हारुग्णालय येथे रेफर करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अशी चर्चा पसरताच अकोट मधील नागरिक प्रत्येक मोहल्यात जागरूक झाले व त्या कुत्र्याला शोधु लागले योगायोग पिसाडलेले कुत्र हे डोहर पुऱ्याकडे धावतांना दिसलें व तेथील नागरिकांनी प्रल्हाद कायवाटे, अली, राजु बोडखे, रहिवाशी नागरिक यांनी मिळून त्या कुत्र्याला मारण्यात यश आले व पुढे त्या कुत्र्या पासून होणारा अनर्थ टळला असेच आणखी मोकाट व पिसाडलेले कुत्रे आकोट मध्ये प्रत्येक चौकात प्रत्येक मोहल्ला गल्लीत आहेत.
करिता आरोग्य विभागाने या मोकाट पिसाडलेले कुत्र्यांना पकडून गावाबाहेर सोडून देण्यात यावे जेनेकरून लोकांच्या जीवास धोका निर्माण होणार नाही याची गंभीर्याने दखल घेण्यात यावी जेणेकरून पुढे असे काही कृत्य घडणार नाही असे लखन इंगळे यांनी संबंधित अधिकारी यांना दिलेला निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी नितीन तेलगोटे, विक्की तेलगोटे, नवनीत तेलगोटे, प्रतीक तेलगोटे, रामेश्वर दाभाडे, राजु भोंडे, विशाल पडघामोल, प्रवीण सोनोने, विलास सूर्यवंशी, प्रतीक नेमाडे, महेश इंगळे, यांच्या सह्या आहेत.