अकोला, दि.25: जिल्ह्यात विविध मार्गाने पशू, पक्षांची सेवा करणारे प्राणी मित्र आहेत. या सेवा कार्याची व्याप्ती वाढविणे व सुसंघटीतपणे कार्य व्हावे या उद्देशाने सर्व प्राणी मित्रांची नोंद करण्याचा उपक्रम जिल्हा पशुसंवर्धन विभागाने सुरु केला आहे. तेव्हा अशा संवेदनशील प्राणी प्रेमी , पक्षी प्रेमी नागरिकांनी आपली नोंद जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, अकोला येथे करावी.
नोंदणी केलेल्या प्राणी मित्रांची मुलाखत दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या दालनात घेण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत नोंद करणाऱ्यांना सेवाभावी पद्धतीनेच आपले कार्य करावे लागेल, त्यांना वेतन वा मानधन मिळणार नाही याची नोंद घ्यावी,असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अकोला यांनी कळविले आहे.