अकोला दि.२५ येथील पंचायत समितीच्या वतीने रविवार दि.२७ रोजी आमसभा व सरपंच शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर हे राहणार आहेत. हा कार्यक्रमा सकाळी दहा वा. आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती प्रतिभाताई भोजने, खासदार संजय धोत्रे, विधान परिषद सदस्य आ. डॉ. रणजीत पाटील ,आ. अमोल मिटकरी, आ. किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, विधान सभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. हरिष पिंपळे, आ. नितीन देशमुख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड, कृषी पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, महिला बालकल्याण सभापती स्फुर्तीताई गावंडे, सम्राट डोंगरदिवे तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन पं.स. सभापती राजेश वावकार, उपसभाअपती आनंदराव डोंगरे, गटविकास अधिकारी राहूल शेळके यांनी केले आहे.