अकोला दि.24 : क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या प्रतिमांना अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अधीक्षक मिरा पागोरे, अशोक साबळे, नितीन निंबुळकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.