अकोला: दि. २३.०३.२०१८ रोजी दु. १२.०० वा. भारतीय कम्युनिट पक्ष व आयटक कामगार संघटना कार्यालयात भा.क.प. सचिव कॉ. रमेश गायकवाड यांनी शहिद कॉम्रेड भगतसिंग, कॉम्रेड राजगुरू व कॉम्रेड सुखदेव यांच्या प्रतिमेस हार अर्पण केले नंतर कॉम्रेड शहीद भगतसिंग चौकात कॉ. नयन गायकवाड यांनी कॉ. शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस हारार्पण करुण उपस्थितानी पुष्प अर्पण केले कार्यालयात सभा घेण्यात सभेत कॉम्रेड रमेश गायकवाड यांनी शहिद कॉम्रेड भगतसिंग, कॉम्रेड राजगुरू व कॉम्रेड सुखदेव यांच्या जीवनावर प्रकाश टाकत कॉग्रेड भगतसिंग व त्यांचे सहकारी यांना कामगार शेतकरी यांचे राज्य आण्याचे होते आताचे राज्य कर्ते आणि ब्रिटिश राज्य कर्ते यांच्यात काहीही फरक नाही फरक फक्त की ते गोरे होते.
हे काळे जो पर्यंत कामगारांचे कर्मचायांचे शेतकऱ्याचे राज्य येणार नाही तो पर्यंत देशाची प्रगती होणार नाही असे प्रतिपादन कॉ. रमेश गायकवाड यांनी केले यानंतर कॉ. नयन गायकवाड यांनी आज शहिद कॉम्रेड भगतसिंग, कॉम्रेड राजगुरू व कॉम्रेड सुखदेव यांना लाल सलाम करुण कॉम्रेड़ शहीद भगतसिंग व त्यांच्या सहकार्यांनी जी लढाई लढली आहे ती लढण्याची जबाबदारी आपल्यवर त्यांचे वंशज हणुन आहे आताचे भाजप मोदी सरकार हे विद्यार्थ्यांना शिक्षणापासुन कसे वंचित ठेवावे यावर जास्त देवून अनेक जागा कमी केल्या आहेत सर्वाना शिक्षा एकसमान हा कॉ. भगतसिंग यांचा नारा होता शिष्यवृत्य बंद करण्याच्या आणि त्यावरील बजेट आधीच या शासनाने कमी केला आहे.
शेतकरी कायद्ये बदले होते ते ७०० दिवस शेतकरी व भारतीय जनतेने आंदोलन करुणभाजपा प्रणीत मोदी सरकारला कायद्ये मागे घेण्यास भाग पाडले आता कामगार कर्मचारी यांची पाळी आहे त्यांनी सुद्धा २८ व २९ या २ दिवसाच्या संपा नंतर मोठ आंदोलन देशात उभारून अन्याय कारक ४ लेबर कोड कायद्ये मागे घेण्यास भाग पाडु या कृषी विद्यापीठाचे कंत्राटी करण थाबविण्या करिता विरुध्द मोठा लढा आता उचलण्याच्या तयारीत रहावे ज्या वेळी केरळ सारखे शेतकरी कामगार यांचे राज्य आनल्यावरच शहिद कॉम्रेड भगतसिंग, कॉम्रेड राजगुरू व कॉम्रेड सुखदेव व त्यांचे सहकारी यांच्या बलीदानाचे फलीत आपणास मिळेल यावेळी कॉ. रमेश गायकवाड, कॉ. नयन गायकवाड कॉ. रामदास ठाकरे, कॉ. भाऊराव खांडेकर, कॉ. आशा खंडारे, कॉ. आनंदा भगत, कॉ. छाया बोदडे, कॉ. अरुणा थोरात व भा.क.प. कार्यकर्ते उपस्थित होते. व उपस्थितांनी कॉ. भगतसिंग, सुखदेव, राजगुरु अमर रहे, अमर रहे कॉ. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, जिंदाबाद… जिंदाबाद…. कॉ. भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांनी लाल सलाम, लाल सलाम.., कॉ. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अमर रहे. अमर रहे. ., कॉ. भगतसिंग जिंदा जिंदा है. जिंदा जिंदा है…. कॉ. सुखदेव जिंदा जिंदा है. जिंदा जिंदा है… कॉ. राजगुरु जिंदा जिंदा है… जिंदा जिंदा है… असे गगण भेदी नारे लाबुन कार्यक्रमाची सांगता झाली…!