तेल्हारा : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बिज व छ्त्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हवामान तज्ञ पंजाब डख यांचे मार्गदर्शन व भव्य शेतकरी मेळावा चे आयोजन दि 21 मार्च ला तेल्हारा येथे श्री छत्रपती प्रतिष्ठान व कृषी व्यावसायिक संघ यांच्या वतीने करण्यात आले होते .
सर्व प्रथम जगद्गुरू संत तुकाराम चौक येथील संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे हारपर्ण व पूजन करून स्वागत रॅली काढण्यात आली या रॅली मध्ये आकर्षक सजवलेल्या बैलबंडी मध्ये पंजाब डख यांचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले .टॉवर चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतड्याचे पूजन करून फटाक्याची आतिषबाजी करत ठिकठिकाणी पंजाब डख यांचे स्वागत नागरिकांनी केले. स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्ञानपीठ , नगर परिषद शाळा क्र 1 मध्ये कार्यक्रम स्थळी हजारो नागरिकांच्या उपस्थित सर्व प्रथम भक्तिमय वातावरणात स्वराश्रय संगीत क्लासेच्या भजन संध्येने व जगद्गुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी पंजाब डख यांचा सत्कार छत्रपती प्रतिष्ठान व कृषी व्यवसाय संघ यांच्या वतीने श्री छत्रपती कृषी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले, यामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या भूमिकेत तुकाराम मारखडे व शिवाजी महाराजांचा भूमिकेत मनीष गवळी ,मावळे सचिन मोहोड , शंकर वानखडे यांनी भूमिका साकारल्या व गुरुदेव सेवा मंडळाच्या बालकांनी देखाव्यात सहभाग घेतला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसिलदार गुरव साहेब, ठाणेदार ज्ञानोबा फड, कृषी अधिकारी मिलिंद वानखडे, कृषी व्यवसाय संघाचे अध्यक्ष राधेशामजी जावंधिया , व सचिव मुरलीधर जळमकार, गजानन उंबरकार, श्रीकृष्ण ठाकरे, संदीप खारोडे ,मनोहर चितलांगे प्रकाशसिह मालिये, शालीग्राम सोनटक्के, संजय अढाऊ,सौ.आरती गायकवाड,संगीताताई देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती ,त्यानंतर शेतकऱ्यांचे कैवारी पंजाब डख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन ठोंबरे सर तर प्रास्ताविक सचिन थाटे व आभार प्रदर्शन गजानन गायकवाड यांनी केले यावेळी हजारो शेतकरी उपस्थित होते ,न. प .प्रशासन यांचे कार्यक्रमाला सहकार्य मिळाले यावेळी छत्रपती प्रतिष्ठान चे प्रदीप सोनटक्के , गजानन गायकवाड, दबडघाव सर, किशोर डांबरे , गौरव धुळे , स्वप्नील सुरे ,निलेश धनभर, सुरज काईगे व कृषी व्यवसाय संघाचे सर्व पदाधिकारी ,व वाण बचाव समितीचे सदस्य , व शेतकरी बांधवांनी कार्यक्रमा परिश्रम घेतले.यावेळी पोलीस स्टेशन यांचा चोख पोलीस बंदोबस्त होता या मार्गदर्शन मेळाव्यामुळे पुढील भविष्यात होणाऱ्या शेती विषयक माहितीचे व हवामानाचे अंदाज शेतकऱ्यांना लागणार असून सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातवरण निर्माण झाले आहे.