नवी दिल्ली: विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी सोमवारी सांगितले की केंद्रीय विद्यापीठांना पदवी अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विद्यापीठ संयुक्त प्रवेश परीक्षेत (#CUET) मिळालेल्या गुणांचा वापर करावा लागेल. ते म्हणाले की, CUET जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल.
याचा अर्थ 12वी मध्ये मिळालेल्या गुणांचा विविध विद्यापीठांच्या पात्रता निकषांशिवाय विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर परिणाम होणार नाही. पत्रकार परिषदेदरम्यान कुमार म्हणाले की, वर्ष २०२२-२३ शैक्षणिक वर्षापासून, राष्ट्रीय परीक्षा एजन्सी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी (#CUET) आयोजित करेल. सर्व केंद्रीय विद्यापीठांना त्यांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी(#CUET)मध्ये मिळालेल्या गुणांचा विचार करावा लागेल.
देशातील ४५ केंद्रीय विद्यापीठांना UGC कडून आर्थिक मदत मिळते. कुमार म्हणाले की CUET चा अभ्यासक्रम NCERT च्या 12 वीच्या अभ्यासक्रमासारखा असेल. CUET मध्ये सेक्शन-1A, सेक्शन-1B, सामान्य परीक्षा आणि पाठ्यक्रम -विशिष्ट विषय असतील. सेक्शन-1A अनिवार्य असेल, जे 13 भाषांमध्ये असेल आणि उमेदवार त्यांच्या आवडीची भाषा निवडू शकतात.
कुमार म्हणाले की, विद्यार्थ्यांना इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दूचा पर्याय असेल. यूजीसी अध्यक्ष म्हणाले की, विद्यापीठांच्या आरक्षण धोरणावर CUET चा कोणताही परिणाम होणार नाही. ते म्हणाले की CUET नंतर कोणतेही केंद्रीय समुपदेशन केले जाणार नाही.