अकोला दि.21: भारत निवडणूक आयोगाने जागतिक महिला दिनानिमित्ताने स्त्री, पुरुष व तृतीय पंथी यांनी आपल्या जगण्यात लिंगभाव समता आणण्यासाठी केलेले प्रयत्न, संघर्ष, अनुभव या उपक्रमासाठी लिहून पाठवायचे आहे. याकरीता ‘अनुभव लेखन कशासाठी? लिंगभाव समतेसाठी’ या विषयावर अनुभव लेखन उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमात सहभागी होण्याकरीता 25 मार्चपर्यंत अनुभव किंवा लेख पाठवा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. अनुभव लेखन उपक्रमाअंतर्गत प्राप्त लेखाचे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या सविस्तर माहितीकरीता https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.