तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील ईसापुर येथिल सिमेट काॕक्रीट स्ता व नालीचे बांधकामाची सुरवात करण्यात आली जिल्हापरिषद समाज कल्याण विभाग अंतर्गत दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करण्यासाठी सात लक्ष रु निधी सौरउर्जा लाईट पाच लक्ष आणी सामाजीक सभागृह सात लक्ष असे एकुन १९ लक्ष मंजुर झालेले असुन त्यापैकी सिमेंट काॕक्रेट रस्त्याची व नाली बांधकामाची सुरवात दि. १७ मार्च रोजी जि. प. सदस्य संजय अढाऊ, उपसरपंच महादेवराव नागे, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव अशोक दारोकार, संजय लांडे, पञकार आनंद बोदडे खंडुजी घाटोळ यांचे उपस्थीतीमध्ये करण्यात आली यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरीक हरिदास बोदडे, लखुजी घाटोळ, देवराव बोदडे, प्रविण वारुळकर, यशवंत वारुळकर, देवानंद बोदडे, सुनिल घाटोळ, शरद बोदडे, उपस्थित होते.
ईसापुर चे भुमीपुञ अण्णासाहेब बोदडे उपआयुक्त पिंपरी चिंचवड म.न.पा.यांणी ईसापुर येथे आयोजीत केलेल्या प्रज्ञाबुध्दविहाराच्या वर्धापण दिन व भव्य धम्ममेळावा श्रध्दैय अॕड. बाळासाहेब आंबेडकर यांचे उपस्थितीमध्ये गेल्या आठ, वर्षापुर्वी संपन्न झाला होता यावेळी हजारो नागरीक उपस्थित होते. मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करतांना अॕड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले के़द्र व राज्य सरकारने निधी दिल्यास अकोला जिल्हा परिषेदेच्या माध्यमातून ग्रामीण भाग विकासाचे माॕडल बनविनार असे उदगार त्यांणी,काढले होते त्यांणी काढलेले उदगार आम्ही ईसापुर ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुर्ण करण्यासाठी कटिबध्द असुन मी सरपंच पदाचा पदभार स्विकारुन एक वर्ष पुर्ण झाले एक वर्षामध्ये अनेक समस्या मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न केला असुन गावातील प्रमुख रस्ते आणी अंतर्गत रस्ते पाणी आरोग्य आणी स्वच्छता ,पायाभुत सुविधा सर्व सामान्य नागरीकांचे प्रश्न घरकुल धारकांचा प्रश्न याकडे जास्त लक्ष देऊन गावच्या सर्वागीन विकास करण्यासाठी जिल्हापरिषद आणी पालकमंञी, आमदार, खासदार, यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आनुन ईसापुर हे गाव विकासाचे माॕडल कसे बनविता येईल या करीता ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करनार.
सौ.मिराताई बोदडे
सरपंच ग्रामपंचायत ईसापुर