अकोट (देवानंद खिरकर)-: अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बहुल शहानुर गावात नुकताच कोवीड लसीकरणाचा दुसरा डोसचे आयोजन करण्यात आले होते.या लशीकरणात एकूण ९२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यावेळी आरोग्य उपकेंद्र पोपटखेडचे डॉ.अब्दुल शहेबाज, डॉ.आरीफ खान, ए. एन. एम. बागल मॅडम, एम.पी. डब्ल्यू रमेश अल्हाटकर, परिचारिक दादाराव सोनोने, यांनी परिश्रम घेतले.
या लसीकरणाला महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष अहेमद शेख यांनी भेट देऊन, अतिदुर्गम भागात होत असलेले लसीकरणाबाबत आणि आदीवासी बहुल नागरीकांचा मिळालेला प्रतिसादा बाबत समाधान व्यक्त केले. यावेळी गावकऱ्यांनी लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.