अकोला,दि.17: जिल्ह्यातील उघड्यावर मांस विक्री दुकाने बंद करुन पर्यायी जागेत मास विक्री केंद्र स्थलातरित करा. तसेच प्राण्याचा अवैध विक्री करणाऱ्यावर कडक कार्यवाही करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती सभेत विविध विषयाचा आढावा घेतला. त्यावेळी त्याबोलत होत्या.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची सभा आज(दि.16) पार पडली. या सभेस जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. तुषार बावने, मनपाचे उपाआयुक्त पुनम कळबे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, अन्न औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सा.द. तेलकर, महाराष्ट्र प्रदुषण व नियंत्रक मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर, पीआय नितीन शिंदे, वनविभागाचे सुरेश वडोदे, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे हेमंत खरबे यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, मोकाट फिरणाऱ्या प्राण्याना प्राणी मुक्तता केंद्र तयार करावे. जिल्ह्यातील जंगली जनावरांचा गावात प्रवेश थांबविण्याकरिता गावा जवळच्या जंगलामध्ये प्राण्यांसाठी पाणवठा तयार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. उघडयावर मांस विक्री दुकाने बंद करुन शहराची लोकसंख्या व भोगोलीक स्थिती पाहून जागा उपलब्ध करण्याबाबत महानगरपालिका यांनी कार्यवाही करावी. जिल्ह्यात होणाऱ्या प्राण्याच्या अवैध वाहतूक थांबविण्याकरीता पोलिस विभागाने कार्यवाही कार्यवाही करावी. तसेच पीओपी वापरावर व विक्रीवर निर्बंध आणावे. याकरीता महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने विशेष दक्षता घ्यावी. कापशी तलाव येथे प्राण्याबाबत सुविधा उपलब्ध करणे बाबत चर्चा करण्यात आली. संभाव्य पाण्याची टंचाई लक्षात घेवून प्राण्यासाठी वन तळे तयार करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी दिले.