तेल्हारा-: आज दिनाक 16 मार्च रोजी तेल्हारा तालुक्यातील कोठा येथे पालकमंत्री पांदण योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या शेत रस्त्याचे उद्घाटन कोठा येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील अहेरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक शत्रुघ्नजी अहेरकर अरविंद अहेरकर अनंत अहेरकर पोलीस पाटील प्रमोद कोरडे विलासराव कोरडे श्रीकृष्ण अहेरकर शिवम अहेरकर माधव अहेरकर विक्रम अहेरकर उपस्थित होते.
तेल्हारा तालुक्यातील कोठा शेतशिवारातील पांदण रस्त्याचे काम सुरू झाले. या भागातील शेत रस्त्यासाठी शेतातील माल घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या रस्ते चिखलमय झाले असता शेतकऱ्यांचा माल शेतातच पडून राहतो आता पालक मंत्री पांदण रस्ते अंतर्गत रस्त्याचे काम सुरू झाल्या मुळे शेकर्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी रस्त्याच्या दुतर्फा असलेले शेतकरी दिपक पाटील अहेरकर रोशन अहेरकर सुनील अहेरकर संतोष अहेरकर मुगुटराव अहेरकर विजय गावंडे आनंद गावंडे विलास कोरडे श्रीकृष्ण अहेरकर अनंत अहेरकर अरविंद अहेरकर पुरुषोत्तम ठाकरेव रोमिल ठाकरे विश्वासराव अहेरकर माधव अहेरकर सुधाकर गावंडे शिवाजी गावंडे गणेश गावंडे माधव गावंडे सौरभ विखे आदी शेतकऱ्यांनि काम सुरू झाल्या बद्दल समाधान व्यक्त केले.