हिवरखेड (धीरज बजाज)-: हिवरखेड सोनाळा तेल्हारा टी पॉईंट नजीक बजरंग तिडके यांच्या मळ्यात पत्रकार गजानन दाभाडे यांना अचानक दुर्मिळ प्रकारचा दुतोंडया म्हणून ओळख असणारा “मांडूळ” प्रजातीचा साप दिसून आला त्यांनी तात्काळ याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला व वन परिक्षेत्र अधिकारी फिरते पथक जी. पी. टेकाडे हे तात्काळ दाखल झाले व त्यांनी मांडूळ सापाला ताब्यात घेऊन सातपुडा पर्वतात नेऊन सोडले. यावेळी गजानन दाभाडे, बी. एस. देशमुख, एस. एस. झोटे, बि.एम. जुगनाके, मयूर थुटे, रोमित भालतिलक, अक्षय बनकर, व्ही बी मेरत, इत्यादी उपस्थित होते.
सापाला म्हणून दुतोंडया म्हणतात
सापांच्या सर्व प्रजातींमधील जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे.मंद हालचाल, जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव आहे. वास्तविक पाहता दोन तोंडाचा साप अस्तित्वातच नाही.
मांडूळ सापाबद्दलअनेक अंधश्रद्धा व गैरसमज
अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा व गैरसमज असल्याने मांडूळ ची तस्करी मोठ्या प्रमाणात होते म्हणून या सापाला ब्लॅक मार्केट मध्ये मोठी किंमत मिळत असल्याचे बोलले जाते. कारण पैशांचा पाऊस पाडण्यासाठी, गुप्तधन मिळवण्यासाठी अलौकिक शक्ती प्राप्त करण्यासाठी, चिरतरुण राहण्याच रहस्य, यौव्वन शक्ती वाढविण्यासाठी, एड्स वरील औषध, अदृश्य होण्यासाठी, सोने बनवण्यासाठी मांडूळ चा वापर होतो. अश्या अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा, गैरसमज, भ्रांती असल्याने शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या मांडूळ सापाची प्रजाती संकटात सापडली आहे.