मुंबई: कोरोनाचे सरलेले संकट आणि पूर्वपदावर आलेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा सन 2022-23 चा अर्थसंकल्प (दि. 11) सादर करत आहेत. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या खात्याला आणि आमदारांना पुरेसा निधी मिळत नसल्याच्या तक्रारी शिवसेना मंत्री आणि आमदारांनी केल्या होत्या. या अर्थसंकल्पात त्यांचे समाधान अर्थमंत्री करतात का? याकडेही लक्ष लागले आहे.
- शेतकऱ्यांना अनुदान ते कृषी पंपाना वीज ; राज्याच्या अर्थसंकल्पातील १२ महत्त्वाच्या घोषणा
- शेतकरी कल्याणासाठी महत्त्वाची तरतूद
- हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र स्थापन करणार
- हवेलीमध्ये संभाजीराजे यांचे स्मारक उभे करणार, २५० कोटी खर्च करणार
- नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान
- महिला शेतकऱ्यांना अधिक अनुदान देणार
- शेतकऱ्यांसाठी ५० हजारांऐवजी ७५ हजार अनुदान देणार
- कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी ५० कोटी
- विकासाची पंचसूत्री करणार
- जलसंपदा विभागासाठी १३ हजार २५२ कोटी
- सहन आणि पणन विभागाला अधिक निधी
- अन्न प्रक्रिया योजना वाढवणार
- या वर्षात ६० हजार कृषी वीज पंपाना वीज देणार
- २ वर्षात अपूर्ण सिंचन पूर्ण करणार
- पुणे शहरात ३०० एकरात इंद्रायणी मेडिसीटी उभारणार
- प्रशिक्षित मनुष्यबळासाठी सर्व योजना आधार कार्डशी संलग्न करणार
- मुंबई विद्यापीठातील लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटी
- २ वर्षात १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार
- थोर समाजसुधारकाच्या नावे अध्यापन केंद्र सुरु करणार
- उच्च तंत्र शिक्षण विभागासाठी १ हजार ६१९ कोटींची तरतूद
- शालेय शिक्षणासाठी २ हजार ३५४ कोटी
- पशूधनासाठी ३ फिरत्या प्रयोगशाळा उभारणार
- मोतीबिंदू शस्त्रक्रियेस अत्याधुनिक सुविधा
- नालेसफाईसाठी स्वयंचलित यंत्रणा वापरणार
- स्टार्टअपसाठी तरुणांन विशेष निधी
- मुंबईतील पशुवैद्यकीय दवाखान्यांचा विकास
- क्रीडा विभागाला २८५ कोटींचा निधी
- आरोग्य क्षेत्रासाठी ११ हजार कोटींची तरतूद