रामापूर (देवानंद खिरकर) : अकोट तालुक्यातील ग्राम रामापूर येथील तलाठी निवास कार्यालय बांधले तेव्हा पासून तर आज पर्यंत येथे तलाठी कधीच मुख्यालयी हजर राहत नाहीत तलाठी महाशय अकोट वरून आपले कामकाज पाहत नागरिकांना आर्थिक मानसिक त्रास देत आहेत. या बाबत वेळोवेळी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. सदर वृत्त प्रकाशित होताच रामापूरचे तलाठी यांनी रामापूर येथे दि. 26/1/2022 रोजी रामापूर येथे दवंडी दिली की तलाठी निवास कार्यालयाच्या आजू बाजूला ज्या लोकांनी अतिक्रमण केले असेल ते. व त्या कागदावर 10 शेतकऱ्यांच्या सह्या सुद्धा घेतल्या आहेत. परंतु आज 9 दिवस होऊन सुद्धा त्या अतिक्रमण धारकांनीं आपले अतिक्रमण स्वताहून काढलेले नाही. व तलाठी निवास कार्यालय रामापूर येथे तलाठी सुद्धा मुख्यालयी ऑफिस उघडून आज पर्यंत मुख्यालयी हजर झाले नाहीत ही उल्लेखनीय बाब आहे.
वास्तविक पाहता त्या अतिक्रमण धारकांन विरुद्ध फौजदारी कारवाई करुन तलाठी निवास कार्यालय उघडून रामापूरला मुख्यालयी तलाठी यांनी हजर होणे अपेक्षित असतांना फक्त टाईमपास करून शासनाची दिशाभूल करीत चालढकल करून अंगावरील घोंगळ फेकण्याचे काम रामापूरचे तलाठी हे करीत आहेत. हम करे सो कायदा ही भूमिका घेत आहेत. तरी या आधी सुद्धा वेळोवेळी रामापूर येथील तलाठी निवास कार्यालय बंद बाबत वृत्त प्रकाशित करण्यात आलेले आहे व वरिष्ठ अधिकारी यांना या बाबत माहिती देण्यात आलेली आहे, तरी आज पर्यंत सुद्धा दखल घेऊन रामापूर येथील तलाठी निवास कार्यालय उघडून येथे मुख्यालयी तलाठी हे हजर झालेले नाहीत. तरी सदर प्रकरणाची वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन दोषी विरुद्ध कडक कारवाई करून तलाठी यांना रामापूर येथील तलाठी ऑफिस उघडून तेथे मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश द्यावे. तरी वरिष्ठ अधिकारी हे काय कारवाई करतात याकडे बोर्डी, रामापूर, येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया
रामापूर येथील तलाठी निवास कार्यलय बांधले तेव्हा पासून तलाठी मुख्यालयी कधीच हजर राहत नाही या बाबत लेखी तक्रार पेपरला वृत्त प्रकाशित करण्यात आलेले आहे याची वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन तलाठी यांना मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश द्यावे.
देवानंद खिरकर तक्रारदार
प्रतिक्रिया
रामापूर येथील तलाठी निवास कार्यालय उघडून तेथे हजर राहणे बाबत तलाठी रामापूर यांना आदेश देण्यात आले आहे.
निलेश मडके तहसीलदार अकोट
प्रतिक्रिया
सदर अतिक्रमण बाबत आम्ही रामापूर सचिव यांना सांगितले आहे.
राजेश बोकाडे तलाठी
प्रतिक्रिया
रामापूर येथील तलाठी निवास कार्यालय समोरील अतिक्रमण बद्दल तलाठी बोकाडे यांनी मला पत्र दिले आहे तरी अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल.
सचिव पायघन रामापूर.