तेल्हारा: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीयांच्या अंगी असलेल्या सूप्त गूणांना वाव मिळावा यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा, कराओके गितगायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, तसेच आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामधे जास्तीत जास्त मूलींनी आणि महिलांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ. मिना बासोडे यांनी साभाळले कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून राष्ट्र सेविका समितिच्या तेल्हारा नगर सहकार्यवाहिका अकोला जिल्हा समिती क्रिडा आणि इंद्रधनू शाखेच्या मुख्यशिक्षिका कोमलताई गजाननराव चिमणकर लाभल्या ताई मूलींना ज्युडो कराटे, डम्बेल्स, लाठीकाठी अगदि कोणताही मोबदला न घेता अविरत सेवा करत असतात. त्यामुळे त्यांनी महिलांनी स्वसंरक्षण कसे करावे, आपला परीवार जोडून कसा ठेवावा याचे खूप छान मार्गदर्शन केले. तसेच प्रमूख मार्गदर्शिका तेल्हारा. व अकोट तालुका वरीष्ठ प्रयोगशाळा पर्यवेशिका म्हणून कु. आशाताई जूबळे म्याडम यांनी स्त्रीयांच्या अनेक समस्या बद्दल त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे पटवून दिले. तसेच विशेष अतीथी म्हणून लाभलेले सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री शंतनू वक्ते सर यांनी महिलांनविषयी सूंदर कविता करून कृतार्थ केले.
घेतल्या गेलेल्या विविध स्पर्धांमध्ये नृत्य स्पर्धेमधे प्रथम क्रमांक गायत्री शर्मा द्वीतीय क्रमांक खूशी शिंदे रांगोळी स्पर्धेमधे प्रथम क्रमांक मिना बासोडे द्वितीय क्रमांक वैशू अवचार तसेच तृतीय क्रमांक ज्योती उगले आणि भाग्यश्री गाडगे यांनी पटकावला. तसेच करा ओके गितगायन मधे प्रथम क्रमांक वैशू अवचार आणि द्वीतीय क्रमांक मिना बासोडे यांनी पटकावला कार्यक्रमाची सांगता आशाताईं जूबळे यांनी विजेत्यांना बक्षीस देवून करण्यात आली. तसेच साधनाताई माहोकार यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.