अकोला, दि. 9: मत्स्यव्यवसाय विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने एकूण सहा डाटा एंट्री ऑपरेटर पदांची निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात येणार आहे. नियुक्ती कार्यक्षेत्र अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या जिल्ह्यांसाठी राहिल. उमेदवारांनी त्यांचे अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात किंवा ई-मेल द्वारे संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांचेकडे सादर करून एक प्रत प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, अमरावती विभाग कार्यालयास व ई-मेलवर पाठवावी.
अर्ज करणाची अंतिम दि.14 मार्चपर्यंत आहे. पदभरतीबाबत अधिक माहितीसाठी [email protected] या मेल आयडी व दुरध्वनी क्रमांक 0721-2662801 वर संपर्क साधवा. पदभरतीकरीता इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद राठोड यांनी केले.