अकोला: अकोला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा अकोला बार महिला विधिज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8/3/2022 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील सभा ग्रूहात जागतीक महिला दिन साजरा करण्यात आला तसेच विविध कायदे विषयक बाबतीत चर्चासत्र रंगले.. सदर कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री य गो खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला मंडळ हजर होत्या.
सदर कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री य गो खोब्रागडे यांचे अध्यक्षीय भाषण. लाभले तसेच श्रीमती शयना पाटील जिल्हा न्यायाधीश 1 व एस. एम बैस मुख्य न्यायदंडाधिकारी अकोला तसेच वरिष्ठ विधिज्ञ श्री बी के गांधी, जिल्हा विधी सेवा प्राधीकरण चे सचिव स्वरूप बोस आणि अकोला बार चे अध्यक्ष श्री सी. एन. वानखडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कनिष्ठ लिपीक कुणाल पांडे तसेच इत्यादी मान्यवर उपस्थित होते.