अकोट: अकोट तालुका ग्राम बोर्डी येथे महिला जागतिक दिन साजरा करताना तालुका अध्यक्ष लक्ष्मीताई गावंडे व तालुका सहसचिव वंदनाताई इंगळे यांच्या नेतृत्वात आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलां मुक्ती मोर्चा च्या वतीने दिव्यांग मीरा भालतिलक सोनाली नागनाथ कुंदलता देशमुख उषा तांडे लीला भगत दीपिका खिरकर सीमा मिनाझ अंगणवाडी सेविका या महिलेचा आदर्श माता म्हणून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अकोट पंचायत समिती सभापती व उपसभापती लाभले होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक मध्ये नंदकिशोर गोरडे यांनी आपले विचार व्यक्त केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मीताई गावंडे यांनी भाषणात बोलताना स्त्री मुक्तीचा लढा देणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली शिक्षका माता सावित्री बनवून आपणा सर्वांना सुशिक्षित केले सर्वसामान्य महिलांना हक्क व अधिकार कसा मिळाला स्त्री मुक्तीचा लढा दिला. म्हणूनच आपणा महिलांना अधिकार मिळाला पूर्वीच्या महिलाना कुठलाही अधिकार नव्हता चुल आणि मुल याशिवाय त्यांना कुठलाही अधिकार नव्हता असे त्यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले माता सावित्री माता रमाई माता जिजाई अहिल्या बाई यावेळी बोलताना त्यांच्या जीवन गौरव प्रकाश टाकला यावेळी कार्यक्रमाला उपस्थित महिला मुक्ती मोर्चाचे अकोला जिल्हा संपर्क प्रमुख गणेशराव वाकोडे महिला आघाडी अकोला जिल्हा प्रतिभाताई गिरी जिल्हा संघटक गणेश बोंडे तालुका सचिव चरण इंगळे तालुका उपाध्यक्ष पुष्पा लिहिले. तालुका सहसचिव वंदनाताई इंगळे दीक्षा काळे यावेळी महिला मुक्ती मोर्चा चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच बोर्डी येथील जिल्हा परिषद सदस्य सरपंच ग्रामपंचायत सदस्य सचिव तंटामुक्ती अध्यक्ष व अपंग महासंघाचे तालुका उपाध्यक्ष अनिल राऊत अंगणवाडी सेविका यांनी आपली उपस्थिती दर्शून महिला दिनाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे संचालन दीपिका खीरकर तर आभार वंदनाताई इंगळे यांनी मानले.