मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घर आणि मालमत्तेवर छापेमारी केल्यानंतर आता प्राप्तीकर विभागाने शिवसेनेशी संबंधितांवर छापेमारी सुरु केली आहे. (income tax department)
मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिर्डी देवस्थानचे ट्रस्टी राहुल कनाल यांच्या घरी छापेमारी सुरु असल्याचे समजते.
प्राप्तीकर विभागाने गेल्या आठवड्यात यशवंत जाधव यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय, पालिका कंत्राटदार आणि संबंधितांवर चार दिवस छापेमारी केली होती.
प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत महत्वपूर्ण कागदपत्रे, दस्तऐवज, ०२ कोटींची रोख रक्कम, दीड कोटींचे सोन्याचे दागिने ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. त्यानंतर मंगळवारी सकाळपासून प्राप्तीकर विभागाच्या पथकांनी शिवसेनेशी संबंधितांवर छापेमारी सुरु केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याचबरोबर पुण्यातील काही ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (income tax department)