अकोट: सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले अकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये मंजूर असलेल्या २८ पदांपैकी ८पदे रिक्त आहेत त्यामध्ये मुख्य म्हणजे वैद्यकीय अधीक्षक पदासह वैद्यकीय अधिकारी, ३ अधिपरीचारिका, १ औषधी निर्माण अधिकारी ,२ कक्ष सेविकांची पदे रिक्त आहेत त्यानंतर रुग्णालयात जखमी व्यक्तीची विचारपूस करण्याकरिता असलेला दूरध्वनी क्रमांक बंद आहे. या कारणामुळे उपचाराअभावी व तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना अकोला येथे हलवावे लागत आहे.
अकोला जाण्यासाठी जो मार्ग आहे तो अतिशय खराब असल्यामुळे गंभीर रुग्ण अकोला जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू होतो. अशा विविध कारणांमुळे ग्रामीण रुग्णालय सतत चर्चेचा विषय बनलेला आहे व यावर कोणत्याही वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय मंत्री साहेब यांचे सुद्धा लक्ष नाही . अकोट ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी मिळून सुद्धा प्रत्यक्ष इमारत तर दूर परंतु पदांची भरती सुद्धा झाली नाही तरी या ग्रामीण रुग्णालयाला लागलेले ग्रहण आपण आपल्या स्तरावरून लवकरात लवकर सोडवावे ही विनंती अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मनसे जनहित कक्ष तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल. सदर निवेदन मनसे आकोला जिल्हाअध्यक्ष राजेशभाऊ काळे,मनसे जनहित व विधी विभाग राज्य सरचिटणीस नदाकिशोरजी शेळके यांच्या मार्गदर्शनात, मनसे आकोट तालुका अध्यक्ष कैलासभाऊ धूळे, मनसे जनहित कक्ष जिल्हाअध्यक्ष शशांक कासवे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. याप्रसंगी मनसे जनहित कक्ष शहर सचिव अजय शर्मा, अमोल निचळ, पवन नागले, मंगेश टाकळकर, प्रविण टाकळकर,गणेश केदार, जयेश दुधे, मोहन मिसळकर, इंगोले, सागर पांडे, शुभम रंदे, सुनिल शर्मा, निखील नकाशे, सागर गवई, दत्ता डिक्कर,अमोल निचळ मयुर थुटे, विवेक अंबाळकर, मनोज सोनोने,आशिष गवई, व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.