महान फिरकीपटू व ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्न ( Shane Warne) याचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटकाने अकाली निधन झाले. वादळासारखे आयुष्य जगलेल्या वॉर्नला वयाच्या ५२ वर्षीय जीवनाच्या मैदानातून माघार घ्यावी लागली. त्याच्या जाण्याने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. यावर क्रिकेटमधील दिग्गजांना हा धक्का पचवणे कठीण जात आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही शेन वॉर्नच्या अकाली एक्झिटने व्यथित झाला आहे. त्याने एक भावनिक पोस्ट शेअर करत शेन वॉर्नला श्रंद्धाजली अर्पण केली आहे.
विराटने आपल्या ट्टिवमध्ये म्हटलं आहे की, “काल आम्हाला शेन वॉर्न यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समजली. जीवन खूपच अस्थिर आणि अनपेक्षित आहे. शेन वॉर्न हे एक महान खेळाडू होते. मैदाना बाहेरही माझी त्यांची ओळख होती. अशा व्यक्तीच्या निधनावर मी प्रतिक्रिया देवू शकत नाही”
“आपण जगत असताना येणार्या प्रत्येक क्षणांबाबत आपण कृतज्ञ असायला हवे. वयाच्या ५२ व्या वर्षी मृत्यू होणे अनपेक्षित आहे. शेन वॉर्न यांच्या निधनाने मला धक्का बसला आहे. ते एक प्रामाणिक खेळाडू होते. चर्चा करताना ते नेहमी आपलं मत स्पष्टपणे मांडत असे. शेन वॉर्न हे एक महान खेळाडू होते. त्याचबरोबर मी सामना केलेला एक सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज होते, असेही विराटने नमूद केले आहे.