अकोट- स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालय अकोट, दिनांक 21 ते 23 फेब्रुवारी 2022 ला अणे महिला महाविद्यालय यवतमाळ येथे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत आंतर महाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये 4 खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवून कलर कोट मिळविण्याचा बहुमान महाविद्यालयाला प्राप्त करून दिला. त्यामध्ये मुलींमध्ये कु माहेश्वरी गणोरकर बी.ए. भाग 2 हिने 52 किलो वजन गटात , कु अंजली इंगळे बीकॉम भाग 1 हिने 57 किलो वजन गटात ,मुलामध्ये नयन करवते एम. ए. भाग 1 ह्याने 59 किलो वजण गटात,आणि प्रतीक पाटील बीएस्सी भाग 2 ह्याने 84 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला. 74 किलो वजन गटात रोहित वानरे एम.ए. भाग 1आणि 47 किलो वजन गटात कु माधुरी नाठे बीकॉम भाग 2 यांनी द्वितीय क्रमांक मिळविला
त्याचबरोबर कु अस्मिता इंगळे बीकॉम भाग 1 हिने 47 किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळविला. प्राचार्य डॉ सुनील पांडे यांनी खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व होणाऱ्या आंतर विद्यापीठ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.खेळाडू आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील पांडे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा प्रफुल्ल देशमुख व आई वडील आणि प्राध्यापकांना देतात.श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री हर्षवर्धन देशमुख साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री गजाननराव पुंडकर साहेब आणि कार्यकारी संचालक मा.श्री केशवराव मेतकर साहेब यांनी खेळाडूंचे कौतुक करून त्यांना पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.