व्हॉट्सॲप (WhatsApp) चा जगभरात सर्वात अधिक वापर केला जातो. आपल्या युजर्ससाठी प्लॅटफॉर्मना सुरक्षित ठेवण्यासाठी WhatsApp रेग्युलर अनेक अकाऊंटवर प्रतिबंध करतो. हे अकाऊंट अनेक कारणांनी प्रतिबंधित केलं जाऊ शकतं. महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या व्हॉट्सॲप अकाऊंटला कुठलीही पूर्वसूचना न देता बंदी आणली जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही जर व्हॉट्सॲप युजर आहात आणि तुम्ही ‘या’ पुढील १० चुका केल्या तर तुमचे अकाऊंट कायमसाठी बंद होऊ शकतं.
व्हॉट्सॲपच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये लिहिलंय- आपले व्हॉट्सॲप अकाऊंट आमच्या सेवा अटींचे उल्लंघन करत असल्याचे जर आम्हाला वाटत असल्यास आम्ही खात्यांवर बंदी घालू शकतो. आमच्या सेवा अटींनुसार, आम्ही तुम्हाला सूचना न देता प्रतिबंधित करू शकतो. तुम्ही जर व्हॉट्सअॅप यूजर असाल तर आम्ही तुम्हाला अशा १० गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्याद्वारे तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते.
परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीने शेअर केलेला प्रोफाईल फोटो, स्टेटस आणि इतर वैयक्तिक माहिती वापरणे-
कोणत्याही अनावश्यक हेतूंसाठी स्वयंचलित किंवा मॅन्युअल साधनांचा वापर करून व्हॉट्सॲपवरून मोठ्या प्रमाणात माहिती काढणे टाळले पाहिजे. व्हॉट्सॲप वापरकर्त्यांकडून फोन नंबर, वापरकर्त्याचे प्रोफाईल फोटो आणि व्हॉट्सअॅप स्टेटस यासह माहिती मिळवणे. हे कंपनीच्या नियम अटींचे उल्लंघन आहे.
व्हायरस किंवा मालवेअर पाठवण्यासाठी वापर-
व्हायरस किंवा मालवेअर असलेल्या फाईल्स व्हॉट्सअॅपद्वारे शेअर करण्यास मनाई आहे. इतर वापरकर्त्यांच्या उपकरणांना हानी पोहोचवू शकणार्या फाईली पाठवल्यामुळे तुम्हाला व्हॉट्सॲपवरून प्रतिबंधित केले जाऊ शकते
फोन नंबर शेअर करणे वा अनोळखी क्रमांकवरून मेसेज पाठवणे-
परवानगीशिवाय फोन नंबर शेअर करू नका किंवा वापरकर्त्यांना संदेश पाठवण्यासाठी किंवा त्यांना व्हॉट्सॲपवरील ग्रुप्समध्ये जोडण्यासाठी बेकायदेशीर स्त्रोतांकडून मिळालेला डेटा वापरू नका. असे केल्याने तुमचे खाते प्लॅटफॉर्मवरून बॅन केले जाऊ शकते.
फेक अकाउंट बनवणं-
व्हॉट्सॲपवर बनावट खाते तयार करणे किंवा इतर कोणाचे खाते कॉपी करणे देखील तुम्हाला प्लॅटफॉर्मवरून प्रतिबंधित केले जाऊ शकते. जेव्हा व्हॉट्सअॅप बिझनेसचा विचार केला जातो तेव्हा फसवणूक करणारे अनेकदा वापरकर्त्यांची फसवणूक करण्यासाठी बनावट खाती तयार करतात.
ऑटोमेटेड किंवा बल्क मेसेज पाठवणे-
व्हॉट्सअॅप वापरून बल्क मेसेज, ऑटो-मेसेज किंवा ऑटो-डायल करू नका. व्हॉट्सॲप मशीन लर्निंग टेक्नॉलॉजी आणि युजर्सचे रिपोर्ट दोन्हींचा उपयोग त्या अकाऊंटचा शोध घेण्यासाठी आणि त्यावर बंदी घालण्यासाठी केला जातो, जे नको ते ऑटोमॅटेड मेसेज पाठवतात.
अनधिकृत किंवा ऑटोमेटेड पध्दतीने अकाऊंट बनवणे-
अनधिकृत किंवा ऑटोमेटेड पध्दतीने अकाऊंट बनवणे वा घ्रुप तयार करणे. किंवा व्हॉट्सॲपच्या मोडिफाईड व्हर्जन वापरणे देखील तुमच्यावर बंदी आणू शकते. तुम्ही ऑनलाईन टूल वापरणे टाळावे जे तुम्हाला सहजपणे एकाहून अधिक ग्रुप तयार करण्यात मदत करतात.
ब्रॉडकास्ट लिस्टचा अधिक वापर-
व्हॉट्सअॅपच्या मते, ब्रॉडकास्ट मेसेजचा सतत वापर केल्याने लोक तुमच्या मेसेजची तक्रार करू शकतात आणि कंपनीला अनेक वेळा रिपोर्ट केलेल्या खात्यांवर बंदी घालावी लागू शकते.
चुकीचा मेसेज पाठवणे –
व्हॉट्सअॅपनुसार, जर एखादा कॉन्टॅक्ट तुम्हाला मेसेज पाठवणे थांबवायला सांगितले, तर तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून तो कॉन्टॅक्ट काढून टाकावा आणि त्यांच्याशी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करू नये. अन्य युजर्सनी तुमची तक्रार केल्यास तुमचे व्हॉट्सअॅप खाते बॅन होऊ शकते.
व्हॉट्स अॅप कोड बदलणे किंवा सुधारण्याचा प्रयत्न करणे-
व्हॉट्स अॅपच्या कोडसोबत खेळणे किंवा त्यात बदल करणे तुम्हाला महाग पडू शकते. कंपनीने आपल्या अटी व शर्थींमध्ये असे नमूद केले आहे की, रिव्हर्स अभियंता, एल्टर, मोडिफाय, क्रिएट डेरिव्हेटिव्ह तयार करणे, डिकंपाईल करणे आणि सेवेमधून कोड काढून टाकणे चुकीचे आहे.
जीबी व्हॉट्सअॅप किंवा व्हॉट्सअॅप प्लस वापरणे-
जीबी व्हॉट्सअॅप आणि व्हॉट्सअॅप प्लस सारख्या थर्ड पार्टी अॅप्सचा वापर केल्यास तुमच्या व्हॉट्सअॅपवर बंदी घातली जाऊ शकते. कंपनीने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे की, व्हॉट्सअॅप प्लस हे एक असे अॅप आहे जे व्हॉट्सअॅपने विकसित केलेले नाही आणि व्हॉट्सअॅपला त्यावर कोणतेही अधिकार नाहीत. व्हॉट्सअॅप प्लसच्या विकासकांचा व्हॉट्सअॅपशी काहीही संबंध नाही आणि व्हॉट्सअॅप हे ‘व्हॉट्सअॅप प्लस;ला सपोर्ट करत नाही.