• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कळंबा (कसुरा), मुंडगाव, वडाळी (देशमुख) येथील वीज उपकेंद्रांचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते लोकार्पण

Our Media by Our Media
February 28, 2022
in अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
102 1
0
KALAMBA KASURA PROGRAMM 3
16
SHARES
739
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२८:  राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते महावितरणकडून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत उभारण्यात आलेल्या बाळापूर तालुक्यातील कळंबा(कसुरा), अकोट तालुक्यातील मुंडगाव व वडाळी (देशमुख) येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यास अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, कार्यकारी अभियंता पायाभुत सुविधा यामिनी पिंपळे, अधीक्षक अभियंता पवनकुमार खचोट तसेच अशोक अमानकर, डॉ. प्रशांत वानखडे, राजेंद्र तरवाडे, प्रमोद डोंगरे, महेंद्र गवई आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कोनशीला अनावरण करुन उपकेंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. आपल्या संबोधनात डॉ. राऊत म्हणाले की, रब्बी हंगामाच्या काळात अनेकदा शेतकरी बांधवांना कमी दाबाने विजेचा पुरवठा होतो. शेतकरी बांधवांची समस्या लक्षात घेउन महावितरणने उच्च दाब वितरण योजनेत अकोला जिल्ह्यासाठी आठ नवीन वीज उपकेंद्रांना मंजुरी दिली होती.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आपल्या भाषणात डॉ. राऊत यांनी सांगितले की, नवीन वीज उप केंद्रामुळे ३६ गावातील सुमारे ४ हजार वीज ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. बाळापूर तालुक्यातील कळंबा कसुरा येथील वीज उपकेंद्रांमुळे कळंबा खुर्द आणि बुद्रुक, सोनगिरी, कसुरा या गावातील १४७५वीज ग्राहकांना लाभ होणारा आहे. तसेच कारंजा रंजनपूर वीज उपकेंद्राचा भर कमी होणार आहे. अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील वीज उपकेंद्रांमुळे मुंडगाव अमीनपूर, लोहारी बुद्रुक, लोहारी, चिंचखेड,नवरी खुर्द आणि बुद्रुक, आलेगाव,पिंपरी, डिक्कर, देवरी, देवरी फाटा, आलेवाडी, सोनबर्डी आदींसह २८ गावातील वीज ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. या वीज उपकेंद्रांमुळे अकोट एमआयडीसी आणि अकोट १३२ कि. व्हो वीज उपकेंद्राचा भर कमी होणार आहे. वडाळी देशमुख येथील वीज उपकेंद्रांमुळे शिरसोली, मालपुरा आणि मालठाणा या गावातील वीज ग्राहकांना लाभ होणार असून सावरा आणि पणज वीज उपकेंद्राचा भर कमी होणार आहे.

ते पुढे म्हणाले की, गत दोन वर्षामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये ३८ कोटी रु चे उल्लेखनीय कामे करण्यात आली आहेत. कृषी जोडण्यांबाबत अकोला जिल्ह्यात विविध योजनांमध्ये २८४३ जोडण्या दिल्या आहेत. अनुसुचीत जाती व जमातीतील ग्राहकांना घरगुती वीज जोडण्या त्वरीत मिळाव्या या हेतुनेशासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने अंतर्गत २७६ वीज जोडण्या दिलेल्याआहेत,असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. राऊत म्हणाले की, ग्राहकांना वीज वितरण कंपनीने नेहमीच उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये सगळं जग थांबलं असतांना वीज कंपनीची सेवा अविरत सुरु होती. चक्री वादळासारख्या आपत्तीतही लवकरात लवकर सेवा पुर्ववत केली. मदत पुनर्वसन कार्याला वीज पुरवठा कमी पडू दिला नाही. कोळशाचे संकट निर्माण झाले, त्या काळातही भारनियमनाची झळ लागू दिली नाही. अशा वेळी ग्राहकांनी वीज वापरत असतांना त्याचे बिल भरावे, इतकीच माफक अपेक्षा आहे, केवळ वसुली हा उद्देश नाही, मात्र सेवेतील सातत्य राखण्यासाठी ग्राहकांनी बिल भरावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात उपकेंद्रासाठी जमीन दिलेल्या शेतकरी गोपाळ केशवराव उगले यांचा डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर डॉ. राऊत यांचा कळंबा (कसुरा) सरपंच रामा ठाकरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला.

Tags: AkolaDr. Nitin Raut
Previous Post

वीज निर्मिती केंद्रांच्या परिसरात जैव विविधता उद्यानांची निर्मिती करा- उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

Next Post

क्रीडा प्रबोधिनीमार्फत खेळाडूंचे ‘टॅलेंट सर्च’ ला मुदतवाढ

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
क्रीडा दिन

क्रीडा प्रबोधिनीमार्फत खेळाडूंचे ‘टॅलेंट सर्च’ ला मुदतवाढ

nima arora

जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम; आकाशवाणी अकोला केंद्रावर आजपासून विशेष कार्यक्रम ‘प्रगतीची पाऊले’ द्वारे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य योजनांची माहिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.