तेल्हारा: शहरात एका गुटखा विक्रेत्याच्या घरावर उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर यांनी सकाळी ११.२० वाजताच्या सुमारास छापा टाकून जवळपास पावणे दोन लाखाचा गुटखा जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश कायंदे, पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने छापेमारी करून शासनाने प्रतिबंध केलेला मानवी आरोग्यास अपायकारक तंबाखूजन्य सुगंधीत गुटखा (किंमत १ लाख ७८ हजार ६०० रु.) जप्त करून आरोपीस अटक करून कारवाई करण्यात आली.
उपविभागिय पोलीस अधिकारी रितू खोरवर दि.२७ फेब्रु रोजी सकाळी १०.३० वाजत्याचे सुमारास पोउनि गणेश कायदे तसेच एनपीसी कादीर सलीम गवळी, शेख नासिर शेख, पोको शुभम गिरी, हर्षल खाडे, वैभव चौधरी असे पो स्टे मधून पेट्रोलिंग कामी रवाना झाले असता रितू खोखर यांना गुप्त माहिती मिळाली की शहरातील एका व्यक्तिच्या घरात शासनाने प्रतिबंदीत केलेला सुगंधीत पान मसाला विक्रीकरिता आणून ठेवला आहे.
प्राप्त झालेल्या व खात्रीलायक माहितीच्या आधारे पोलीसांनी आरोपी रवी कुलवंदे (२७) रा. गोपाल टॉकीज मागे तेल्हारा येथे धाव घेऊन सकाळी ११.२० वाजता नमूद आरोपीच्या घरझडती घेतली असता घराच्या मागील खोलीच्या कोपऱ्यात्य पांढऱ्या लास्टीक पोत्यात आरोपीने स्वताचे आर्थीक फायदयाकरिता शासनाने प्रतिबंधीत केलाला १ लाख ७८ हजार ६०० रु. किंमतीचा गुटखा, पानमसाला, तंबाखू मिळून आला पोलीस कॉ गजानन उर्फ राजू इंगळे यांच्या फियोदीवरून आरोपीविरुद्ध भादवी ३२८, १८८,२०२,२७३ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुुढिल तपास पो ऊ निरीक्षक गणेश कायंदे करीत आहेत.