अकोला,दि.24 :- शून्य ते पाच वर्षे या वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण रविवार दि.27 रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात 1006 व शहरी भागात (मनपा वगळुन) 117 बुथ स्थापन करण्यात आले आहे. या बुथवर शून्य ते पाच वर्षे वयोगटातील 1 लाख 30 हजार 108 बालकांना पोलिओचा लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तसेच जिल्ह्यात 45 ठिकाणी रेल्वे स्टेशन व एस.टी. स्टँड इत्यादी ठिकाणी पोलिओ लस पाजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदचे जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी दिली.
रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी होण्याऱ्या लसीकरण मोहिमेला पालकांनी आपल्या शुन्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकांना पोलिओ बुथवर जाऊन पोलिओ लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई मसने, उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले यांनी केले.