अकोला, दि.२४: लघु उद्योग सुरु करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन यासाठी जिल्ह्यातील उत्कृष्ट उद्योजकांना जिल्हा पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात येते. सन २०२१ या वर्षासाठी जिल्ह्यातील लघु उद्योजकांनी दि.५ मार्च पूर्वी विहित नमून्यातील अर्ज भरुन जिल्हा उद्योग केंद्र, अकोला येथे सादर करावे,असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांनी केले आहे.
पुरस्काराचे स्वरुप – प्रथम पुरस्कार १५ हजार रुपये रोख व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार दहा हजार रुपये रोख व गौरवचिन्ह.
निकष – १. लघु उद्योग घटक हा दिनांक १ जानेवारी २०१८ पूर्वी जिल्हा उद्योग केंद्राकडे स्थायी नोंदणी झालेला असावा.
२. कमीत कमी मागील दोन वर्ष सलग उत्पादनात असावा.
३. कोणत्याही बॅंकेचा /वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
४. ज्या घटकांना यापूर्वी राज्य/राष्ट्रीय व जिल्हा पुरस्कार मिळालेले आहेत असे घटक या पुरस्कारास पात्र
होणार नाहीत.
जिल्हा पुरस्कार योजनेचा अर्जाचा नमुना जिल्हा उद्योग केंद्र,भूविकास बॅंक पहिला मजला,एसपी ऑफिस जवळ अकोला दूरध्वनी क्रमांक 0724-2430880 येथे शासकीय कामाकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत प्राप्त करता येईल .
आवश्यक कागदपत्रे- १. स्थायी नोंदणी प्रमाणत्राची झेराक्स प्रत (उद्योगआधार /उद्यमआधार)
२. मागील तीन वर्षाची बॅलेंस सीट
३. बॅंकेचे उद्योगाचे कर्ज खाते नियमित असल्याबाबत प्रमाणपत्र.