अकोला,दि.19 जिल्ह्यातील एपीएल(केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यासाठी मासिक नियतन माहे ऑक्टोंबर ते मार्च 2022 करीता गहु 7770 क्विंटल व तांदुळ 1930 क्विंटल शासनाकडून मंजुर झाले आहे. तसेच शासकीय धान्य गोदाम यांच्या अहवालानुसार गहुचे 8344.27 क्विंटल शिल्लक असल्याने माहे फेब्रुवारीकरीता वाटप शिल्लक असलेल्या साठातून पुढील प्रमाणे करण्यात येत आहे.
अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 250.44 क्वि. तर तांदुळाचा 64.53 क्वि., मुर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 182 क्वि. तर तांदुळाचा 45 क्वि., बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 105.2 क्वि. तर तांदुळाचा 25.96 क्वि., बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 195.01 क्वि. तर तांदुळाचा 49.08 क्वि., पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 154.15 क्वि. तर तांदुळाचा 38.5 क्वि., अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 409.8 क्वि. तर तांदुळाचा 100 क्वि. व तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 110.5 क्वि. तर तांदुळाचा 27.3 क्वि., असे एकूण लाभार्थ्यांना गहूचे 1407.1 क्विंटल तर तांदुळाचे 350.37 क्विंटल मंजुर नियतन झाला आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.