बोर्डी (देवानंद खिरकर):- आज जि. प. व. प्राथ. आदर्श शाळा बोर्डीला मा.डॉ. वैैशालीताई ठग मॅडम शिक्षणाधिकारी (प्राथ) अकोला यांनी गट शिक्षणाधिकारी मा. श्री. संदीप मालवे तथा मा. श्री. नंदकिशोर लहाणे स. का. अधिकारी, समग्र शिक्षा अभियान अकोट यांच्या समवेत आकस्मिक भेट दिली. शाळेच्या प्रत्येक भागाचा, शैक्षणिक बाबीसाठी केलेला उपयोग पाहून मॅडमनी प्रशंसा केली. सर्वप्रथम मॅडम यांनी प्रत्येक वर्गाला भेट दिली. विद्यार्थ्यासोबत संवाद साधुन मार्गदर्शन केले. तथा शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा केली.
डिजिटल साधनाच्या प्रभावी वापरा बाबत माहिती जाणून घेतली व इयत्ता निहाय अध्यापनाविषयी माहिती घेतली. MASQUE /BALA अंतर्गत असलेल्या बाबींवर चर्चा केली. व अपेक्षीत असलेल्या सर्व बाबी या शाळेत पहायला मिळाल्या असे गौरवोद्गार यावेळी काढले. शाळेचे कल्पक BALA टिमचे जिल्हास्तरीय सदस्य मु. अ. श्री. उमेश चोरे तथा सर्व शिक्षकांचे विशेष अभिनंदन त्यांनी यावेळी केले. वर्ग स्तरावर असलेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. शाळेच्या इमारतीचा वापर एक मोठे शैक्षणिक समग्र साहित्य म्हणून वापरल्या जात आहेे. याबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी मा.श्री. संदीपजी मालवे गटशिक्षणाधिकारी पं. स. अकोट यांनीही समाधान व्यक्त केले.शाळेच्या वतीने मा. वैशालीताई ठग मॅडम यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी अकोट पं. स. मधील शिक्षिका सौ. लता बहाकर यांचे बळीराणी हे पुस्तक मॅडमना भेट देण्यात आले. इयत्ता पाचवीमधील विद्यार्थीनीने लिफ मेड ग्रीटींग मॅडमना भेट दिले. याप्रसंगी श्री.अजय अस्वार, श्री. प्रभाकर नागरे, कु. रचना शर्मा, कु.मनोरमा बुंदिले, कु.रुपाली साबळे, कु. किरण लहाने, श्री. आनंद नांदुरकर व शा. पो. आ कर्मचारी निलेश राजगुरु उपस्थित होते.