मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या घटत असल्याने केंद्रांच्या सुचनेनुसार राज्यातील निर्बंध लवकरच शिथिल करण्यात येणार आहेत. त्यानुसार नाट्यगृहं आणि चित्रपटगृहं पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आहे. बुधवारी केंद्राने सर्व राज्यांना निर्बंध शिथिल करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. (कोरोना निर्बंध)
केंद्राच्या दृष्टीने गुरुवारी सचिव पातळीवर घेण्यात आलेल्या बैठकी कोरोनास्थितीचा आढावा घेतला. कोणकोणते निर्बंध शिथिल करता येतील, यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. आज मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एक-दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर नियमावली जारी केली जाईल.
१ फेब्रुवारीपासून राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे सरकारने सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटनस्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सुरु केले आहेत. तसेच लग्नसमारंभासाठी २०० व्यक्तींना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली होती. अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवरील निर्बंध रद्द करण्यात आले आहेत.
अजूनही राज्यात ब्युटी सलून तसेच केशकर्तनालय, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, वॉटर पार्क, उपाहारगृहे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याचे बंधन आहे. त्याचप्रमाणे लसीकरणाची पहिली मात्रा ९० टक्क्यांपेक्षा अधिक आणि दुसरी मात्रा ७० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी घेतलेल्या जिल्ह्यातच या सवलती देण्यात आल्या होत्या. (कोरोना निर्बंध)
असं असली तरी, मागील २० दिवसांत कोरोना रुग्णसंख्या झपट्याने होत आहे. रोज दोन-अडीच हजार कमी होत आहे. त्याचबरोबर रुग्णालयांत दाखल होणाऱ्यांची संख्यादेखील कमी होत आहे. कमी होत जाणाऱ्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर उपाहारगृहे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबरोबरच लग्न आणि समारंभांच्या उपस्थितीवरील मर्यादा वाढविण्यात येणार आहे.