अकोला,दि.17:- हवामान विभाग, मुंबई यांच्या संदेशानुसार रविवार (दि.20 फेब्रुवारी) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये हल्का ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी आपला माल सुरक्षीत ठिकाणी साठवून ठेवण्यात यावा. तसेच बाजार समितीमध्ये शेत माल विक्रीकरीता आणला असल्यास मालाचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणानी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.