अकोला, दि.17: येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), अकोला या संस्थेत प्रशिक्षणाअंतर्गत वापर करुन निकामी झालेले साहित्याचा जाहीर लिलाव सोमवार दि. 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
लिलाव संदर्भातील अटी व शर्ती संस्थेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. विक्री करण्यात येणारे साहित्य कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते पाच वाजेपर्यंत पहावयास मिळेल, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( मुलींची) चे प्राचार्य आर.टी.मुळे यांनी दिली.