कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘डेल्टाक्रॉन’ असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ( Deltacron ) यापूर्वी प्रयोगशाळांमधील त्रुटींमुळे असा व्हेरियंट तयार झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला केला. मात्र ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन आणि डेल्हा या दोन व्हेरियंटपासून हायब्रिड स्ट्रेनचे काही रुग्णमिळाले असून हा कोरोनाचा हा नवा व्हेरियंट ‘डेल्टाक्रॉन’बाबत ब्रिटनची आरोग्य सुरक्षा विभाग हा चिंतेत नाही. कारण याचे रुग्ण खूपच कमी आहेत.
Deltacron : काय आहे ‘डेल्टाक्रॉन’?
ब्रिटनमधील डेली मेलमधील रिपोर्टनुसार, कोरोनाचा नवा व्हेरियंट एका रुग्णांमध्ये आढळला. या रुग्णाला एकाचवेळी ओमायक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हेरियंटची लागण झाली होती. या रुग्णाला झालेला संसर्ग ब्रिटनमध्येच झाला की अन्य देशामध्ये तो बाधित झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या नव्या हेरियंट आढळलेल्या रुग्णाचे आरोग्य सामान्य असून आतापर्यंत तरी त्याला कोणताही धोका नाही.
Deltacron : ‘डेल्टाक्रॉन’ गंभीर स्वरुपाचा नाही
ब्रिटनमधील ‘युकेएचएसए’च्या अधिकार्याने दावा केला आहे की, कोरोनाचा नवा व्हेरियंट डेल्टाक्रॉन संसर्ग गंभीर स्वरुपाचा नाही. या व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये कोणती लक्षणं आढळतात, लसीकरण झालेल्यांवर याचा कोणता परिणाम होतो, हे अ्द्याप स्पष्ट झालेले नाही. संसर्गजन्य रोगांचे विशेष तज्ज्ञ पॉल हंटर यांनी म्हटलं आहे की, या नव्या व्हेरियंटमुळे मोठा धोका निर्माण होईल, असे वाटत नाही. कारण ब्रिटनमध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉनशी लढणारी प्रतिकारकशक्ती सध्या आहे. त्यामुळे सध्या तरी मला डेल्टाक्रॉममुळे मोठा धोका निर्माण होईल, असे वाटत नाही. कारण सध्या डेल्टा आणि ओमायक्रॉनचे रुग्ण कमी होत आहे. त्यामुळे हा नवा व्हेरियंटलाच विस्तारासाठी संघर्ष करावा लागेल”.