अकोला,दि.16:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग (माध्यमिक) व श्री. समर्थ पब्लीक स्कूल, रणपिसे नगर अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त किल्यांचे महत्व व शिवरायांचा इतिहासाबाबत जनजागृती व्हावी याकरीता जिल्ह्यातील सर्व शाळास्तरावर किल्ले बनविण्याची स्पर्धा गुरुवार दि.१७ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धेकांनी सहभागी व्हावे, त्यासाठी नाव नोंदणी करावी,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.
किल्ला स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या स्पर्धेकांनी नोंदणीकरीता संपर्कः-
जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले (मो.नं.9763567169),
जिल्हा परिषद शिक्षण विभाग(माध्यमिक) शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद जाधव(मो.नं.7745820831), श्री. समर्थ पब्लीक स्कूलच्या सुर्वणा गुप्ता (मो.नं.9404090806)
श्री. समर्थ पब्लीक स्कूल व जूनिअर कॉलेजचे (सीबीएसई) (मो.नं.9359811694) यांच्याशी संपर्क साधावा.
तसेच स्पर्धेच्या नियम व अटीसंबंधी माहितीकरीता आशिष चवथे(कला शिक्षक) (मो.नं.9881581838) यांच्याकडे संपर्क साधावा.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या तीन विजेत्यांना श्री. समर्थ पब्लीक स्कूल, रणपिसे नगर अकोला यांच्याव्दारे प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये, व्दितीय पोरितोषिक तीन हजार रुपये, तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये व प्रोत्साहनपर एक पारितोषिक एक हजार रुपये देण्यात येणार आहे. स्पर्धेकांचे मुल्यांकनासाठी शिक्षणधिकारी(माध्यमिक) यांच्या नियंत्रणाखाली मुल्यमापन समितीचे गठन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे मुल्यमापन शुक्रवार दि. 18 फेब्रुवारी रोजी किल्ले केलेल्या प्रत्यक्ष ठिकाणी जावून करण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.