आधार कार्ड जर हरवले तर आता काळजी करण्याची कोणतेही गरज नाही, कारण आता त्याची दुसरी प्रत मिळेल. आणि तीही सरकारी कार्यालयात न जाता. आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. ही प्रक्रिया आपल्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने ऑनलाइन प्रक्रियेच्या मदतीने करू शकता.
कसा करायचा आधार कार्डसाठी ‘ऑनलाइन’ अर्ज
- सर्व प्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/retrieve-eid-uid या लिंकला भेट द्या
- त्यानंतर आधार क्रमांक निवडा
- पूर्ण नाव टाईप करा
- आधारकार्डला लिंक असलेला फोन नंबर त्यामध्ये टाका
- तुम्ही मोबाइल नंबर ऐवजी ईमेल आयडी देखील वापरू शकता
- यानंतर लिंक असलेल्या मोबाईल नंबरला ओटीपी येईल
- आणि मेल आयडीवर OTP येईल
- OTP प्रविष्ट केल्यानंतर सबमिट करा.
- त्यानंतर 12 अंकी आधार कार्ड क्रमांक मोबाईल नंबरवर SMS द्वारे येईल
असा करा ‘ई-आधार’चा अर्ज
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर 12-अंकी आधार कार्ड क्रमांक टाका.
- कॅप्चा कोड भरल्यांनतर OTP पाठवा.
- Verify & Download वर क्लिक करा
- यानंतर नवीन तयार केलेले ई-आधार डाउनलोड होईल.