अकोला,दि.16 : जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी माहे फेब्रुवारी करिता गहु व तांदुळाचे मासिक नियतन मंजुर झाले आहे. त्यात प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना गहुचे 9 हजार 322.56 क्विंटल व तांदुळाचे 6 हजार 180.38 क्विंटल मंजूर नियतन झाले आहे. तर अंत्योद्य लाभार्थ्यांसाठी गहुचे 906.38 क्विंटल व तांदुळचे 1 हजार 191.46 क्विंटल मंजूर नियतन झाले आहे.
त्यानुसार माहे फेब्रुवारी या कालावधीकरीता तहसिलनिहाय वितरण पुढील प्रमाणे :
प्राधान्य गटाकरीता लाभार्थ्यांना अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 5086.33 क्वि. तर तांदुळाचा 3358.5क्वि., मुर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 883 क्वि. तर तांदुळाचा 589 क्वि., बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 482.93 क्वि. तर तांदुळाचा 324.17 क्वि., बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 964.84 क्वि. तर तांदुळाचा 635.32 क्वि., पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 504.47 क्वि. तर तांदुळाचा 336.26 क्वि. अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 1047.89 क्वि. तर तांदुळाचा 713.2 क्वि. व तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 353.1 क्वि. तर तांदुळाचा 223.9 क्वि., असे एकूण गहूचे 9322.56 क्विंटल तर तांदुळाचे 6180.38 क्विंटल मंजुर नियतन झाला आहे.
अंत्योदय लाभार्थ्यांसाठी अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 201.94 क्वि. तर तांदुळाचा 259.61 क्वि., मुर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 100 क्वि. तर तांदुळाचा 133 क्वि., बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 120.05 क्वि. तर तांदुळाचा 158.81 क्वि., बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 180.14 क्वि. तर तांदुळाचा 239.18 क्वि., पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 132.75 क्वि. तर तांदुळाचा 176.66 क्वि. अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 154.4 क्वि. तर तांदुळाचा 203.6 क्वि. व तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 17.1 क्वि. तर तांदुळाचा 20.6 क्वि., असे एकूण गहूचे 906.38 क्विंटल तर तांदुळाचे 1191.46 क्विंटल मंजुर नियतन झाला आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.