अकोट (देवानंद खिरकर) : सुपर मार्केट व किराणा दुकानातील वाईन विक्रीचा निर्णय शासनाने त्वरित मागे घेण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आज ता. 15 फेब्रुवारीला अकोट SDO आणि तहसीलदार यांचे मार्फत आज मुख्यमंत्री यांचेकडे पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र ही संत,महात्मे, महान योध्ये, आणि पुरोगामी चळवळीची भूमि आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगे महाराज,संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज इत्यादि संतांनी समाज निर्व्यसनी व्हावा, यासाठी हालअपेष्टा सहन करत समाजाचे प्रबोधन केले. तेव्हा महाराष्ट्र मंत्री मंडळाने राज्याला व्यसनमुक्त राज्य करण्यासाठी विविध योजना व कार्यक्रम आखने अपेक्षित होते, पण असे काहीही न करता या उलट शासनाचा महसूल वाढवण्याच्या हेतुने व काही वाइनरिज मालकाच्या हिताच्या दृष्टिने शेतकरी हिताचे कारण पुढे करुण 1000 चौ. फुटाचे सुपरमार्केट व किराणा दुकानात वाइन ( मराठी अर्थ दारू ) विक्रीचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने दि. २७ जानेवारी ला घेतलेला आहे.
सदर निर्णयामुळे रोजगार मागणाऱ्या वैफल ग्रस्त तरुणाच्या हातात वाईन सहजरित्या उपलब्ध करुण दिल्या जाईल ज्यामुळे समाजात गुंडप्रवृत्ती वाढून अराजकता निर्माण होईल व गुन्हेगारीचे प्रमाण वाढेल त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मंत्री मंडळाने सुपरमार्केट/किराना दुकानात वाईन विक्रीचा दुर्दैवी निर्णयाचा पुनर्विचार करुण सदर निर्णय रद्द करावा. अन्यथा श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने या निर्णयाच्या विरोधात तीव्र जन आंदोलन करण्याची वेळ श्री. गुरुदेव सेवा मंडळावर येईल. याची सर्व जबाबदारी आपल्या सरकारची राहील. याची नोंद घ्यावी असा इशारा दिलेल्या निवेदनातून देण्यात आला यावेळी प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे नेतृत्वात डॉ धर्मपाल, वैष्णव महाराज बोरोडे, श्री विजय बेदरकर, श्री. राजुदादा खापरकर, अर्पण खापरकर, वैभव वनकर, श्री. विश्वास कुरवाडे, इब्राहिम सर, कल्पेश तांबटकार, आदि उपस्थित होते.