मुंबई: बाॅलिवुडचे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचे निधन झालं आहे. त्यांनी ६९ व्या वर्षी अखेरचा मंगळवारी रात्री ११ च्या सुमाराच श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते, त्यामुळे त्यांच्यावर जुहूच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील वर्षी बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण झालेली होती.
बप्पी लहरी यांना सोन्याचे दागिने घालणे आणि डोळ्यांवर कायम चश्मा लावणे त्यांना पसंत होते. गळ्यात जाड सोन्याच्या चेन्स, बोटांमध्ये सोन्यांच्या अंगठ्या घालणं त्यांना आवडत होते. अंगावरील दागिन्यांमुळेही त्यांची वेगळी ओळख होती. बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांना बाॅलिवुडचा पहिला राॅक स्टार असंही संबोधलं जात होतं.
२००० नंतरदेखील चित्रपटांमध्ये ते सक्रिय आहेत. ‘टॅक्सी नंबर 9211,’ ‘द डर्टी पिक्चर,’ ‘हिम्मतवाला,’ ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आणि ‘व्हाय चीट इंडिया’ या चित्रपटातील गाण्यांना संगीत दिलं.