राज्यसभेचे सभापतींना मी पत्र देवून मला दिला जात असलेल्या त्रासाची माहिती दिली. यापूर्वी भाजपचे प्रमुख नेते मला भेटले. त्यांनी मला हे सांगण्याचा प्रयत्न केला की, तुम्ही या सरकारमधून बाहेर पडा. आम्हाला हे सरकार घालवायचे आहे. काही आमदार आमच्या हाताशी लागत आहेत. तुम्ही आमचे सरकार येण्यासाठी मदत करा, असे मला सांगितले. तुम्ही मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील, अशी धमकी मला दिला. तुम्हाला पश्चाताप होईल, अशी धमकी भाजप नेत्यांनी मला दिली, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
यावेळी राउत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे वर्षा बंगल्यावरुन पत्रकार परिषद पाहत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनीही महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांचे आम्हाला आर्शीवाद आहेत. मन स्वच्छ असेल तर कोणालाही घाबरण्याची गरज नाही. केंद्रीय तपास यंत्रणा काही नेत्यांवर जाणीवपूर्वक कारवाई केली जात आहे. हे महाराष्ट्रावर संकट आहे. तसेच पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई सुरु आहे.