• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यकम : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करा – अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांचे निर्देश

Our Media by Our Media
February 14, 2022
in अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
83 1
0
National Tobacco Control Program
17
SHARES
598
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१४:- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तंबाखूजन्य पदार्थांचे सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करत असतांना सार्वजनिक ठिकाणी तंबाखू पदार्थ्यांचे सेवन, धुम्रपान आदी कृत्य करुन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी आज येथे दिले.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा आज अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेस जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. फारिस अहसन, जिल्हा सल्लागार डॉ. प्रीती कोगदे, सहायक पोलीस निरीक्षक महेश गावंडे, अशासकीय सदस्य तसेच इंडियन डेन्टल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चांदरानी, डॉ. मोहन खडसे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्हा सल्लागार डॉ. प्रीती कोगदे यांनी माहिती सादर केली. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २९७ जणांवर सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवनासंदर्भात कारवाई करण्यात आली असून त्याद्वारे १५ हजार ७२७ रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले. तसेच अन्न औषध प्रशासन विभाग व पोलीस दल यांच्या वतीने कारवाई करुन तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थ, गुटखा इ. जप्त करुन नष्ट करण्यात आले. जप्त करुन नष्ट केलेल्या मालाची किंमत एक कोटी ८८ लाख ९६ हजार ८६० रुपये इतकी आहे. आता पर्यंत या संदर्भात २७२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तंबाखू सेवनाची सवय जडलेल्यांना व्यसन सोडविण्यासाठी समुपदेशन देण्यात येते त्याचा लाभ ४६७ जणांनी घेतला आहे.

अपर जिल्हाधिकारी खंडागळे यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे, तंबाखू गुटखा सेवन करणे याबाबत संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यासाठी आधी कायद्याची माहिती करुन देऊन कारवाई करावी. अशा कारवाईसाठी पोलीस दलाने आवश्यक ते मनुष्यबळ पुरवावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी एक व्यापक जनजागृती मोहिम राबवावी. त्यात महाविद्यालयीन युवक युवतींचा सहभाग घ्यावा,असेही निर्देश खंडागळे यांनी दिले. धम्मसेन शिरसाट, नंदन चोरपगार यांनी परीश्रम घेतले.

Tags: AkolaAnil KhandagaleNational Tobacco
Previous Post

प्रेमः माणसा माणसा कधी होशील माणूस?

Next Post

हिवरखेड अकोटच्या रेल्वे प्रवाशांवर अन्याय! अकोट पासून रेल्वे फेऱ्या सुरू करण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचा आरोप

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Hivarkhed Akot

हिवरखेड अकोटच्या रेल्वे प्रवाशांवर अन्याय! अकोट पासून रेल्वे फेऱ्या सुरू करण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचा आरोप

‘न्याय्यपशुवैद्यकशास्त्र दृष्टीने पशुशवविच्छेदन’, याविषयावर ऑनलाईन प्रशिक्षण: देशभरातील १८८ पशुवैद्यकांचा सहभाग

‘न्याय्यपशुवैद्यकशास्त्र दृष्टीने पशुशवविच्छेदन’, याविषयावर ऑनलाईन प्रशिक्षण: देशभरातील १८८ पशुवैद्यकांचा सहभाग

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.